‘येवले अमृततुल्य’ चहा पावडर, चहाच्या मसाल्यांच्या उत्पादनावर बंदी!


एएमसी मिरर : वेब न्यूज
अल्पावधीमध्ये चहाप्रेमींमध्ये मनामध्ये स्थान मिळवणारा पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले अमृततुल्य’ चहा अडचणीत आला आहे. ‘येवले अमृततुल्य’ चहाच्या चहा पावडर आणि चहाच्या मसाल्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच एफडीएने सहा लाख रुपयांचा साठाही जप्त केला आहे. 'सामना ऑनलाइन'ने याबाबत वृत्त दिले आहे.
चहा पावडरमध्ये मेलानाईटचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वापर करून चहा बनवत असल्याची बातमी ‘मास हिरो’ या साप्ताहिकाने 14 सप्टेंबर, 2019 ला प्रसिद्ध केली. या बातमीची शहानिशा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात येवले चहाच्या प्रिमिक्स बनवणाऱ्या उत्पादक पेढीची तपासणी करून विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला 6 लाखांचा संशयास्पद साठा जप्त केला.
विक्रीसाठी तयार केलेल्या पॅकेटवर अन्न सुरक्षा कायदा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आवश्यक ती माहिती असलेले लेबल असणे आवश्यक व बंधनकारक असतानाही संबंधित पॅकेटवर कोणतेही लेबल नसल्याने यात कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहे याची सर्वसामान्यांना कोणतीही माहिती होत नाही. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चा उद्देश साध्य होण्यासाठी संबंधित अन्न आस्थापनांने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षक ठेवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आर्हता धारण केलेल्या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक असताना तसे आढळून आले नाही. त्यामुळे जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीने संबंधित अन्न आस्थापनास त्यांचे उत्पादन व विक्री पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post