नगर : विधानसभेकरीता वीस हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त्या

 
एएमसी मिरर : नगर 
विधानसभेकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे वीस हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली आहे,
जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. नगर जिल्ह्यामध्ये 3722 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर कक्ष अधिकाऱ्यांसह अन्य लोकांच्या नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल जिल्ह्यातील 20 हजार जणांना आदेश देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच पंचायत समितीचे कर्मचारी यांचा समावेश आहे. यामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई यांचा समावेश आहे.
या सर्वांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून तीन टप्प्यांमध्ये हे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. पहिले प्रशिक्षण दिनांक 6 ऑक्टोबर त्यानंतर 13, व  20 तारखेला होणार आहे.  मतदान करता एकूण 6908 BU तर 5086 CU व 5728 vvpat मशीन प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाने अतिरिक्त मशीन उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये आवश्यक असणाऱ्या मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post