अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल


एएमसी मिरर :वेब न्यूज 
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. यकृताचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिग बी यांनी यापूर्वी आपले यकृत केवळ २५ टक्के कार्यरत असल्याचे सांगितले होते.


अमिताभ बच्चन यांना तब्येतीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना गेल्या मंगळवारी रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
बच्चन यांना १९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना यकृताचा त्रास जाणवू लागला आणि त्यांचे यकृत ७५ टक्के काम करत नव्हते. ज्यावेळी बिग बी यांना दुखापत झाली होती तेव्हा त्यांना चुकीने 'हेपेटाइटिस बी'ने ग्रस्त रुग्णांचे रक्त चढविण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post