देशात मंदी असल्याची मुकेश अंबानींची परदेशातून कबुली!

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
देशात आर्थिक मंदी असल्याबाबत केंद्र सरकारने थेट कबुली दिली नसली, तरी तिची दाहकता जाणवू लागली आहे. देशात आर्थिक मंदी असल्याची स्पष्ट कबुली रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि मोदी सरकारचे अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या मुकेश अंबानी यांनीच दिली आहे.
सद्यस्थितीत आर्थिक मंदी असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात आर्थिक मंदी असल्याबाबत जरी अंबानी यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांनी ही आर्थिक मंदी तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलल्याने काही महिन्यांमध्ये यात सुधारणा दिसून येतील. भारतीय अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी येईल, असे सांगत त्यांनी विश्वास व्यक्त केला. ते सौदी अरेबियामध्ये ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तर या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गज व्यावसायिक सहभागी झाले होते.
यावेळी, अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत बद्दल, सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याचे चित्र आहे. मात्र ही स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे आहे असे म्हटले आहे. हे मत आपले आहे असेही ते म्हणाले. तसेच या स्थितीत बदल करण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारकटून ज्या उपययोजना करण्यात आल्या आहेत त्याचा परिणाम नक्कीच दिसेल. तर पुढील तीन महिन्यात देशाच्या आर्थिक स्थितीत बदल दिसेल असेही अंबानी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान बिन अब्दुल अझीझ अल सऊद आणि त्यांचे सुपुत्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांचा संदर्भ देत, त्यांनी  सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला गती दिल्याचे म्हटले आहे.
सौदी अरेबिया आणि भारत या दोन्ही देशांना चांगले, उत्तम उत्तम नेतृत्व लाभल्याने बदल पहायला मिळत आहेत. उत्तम उत्तम नेतृत्वामुळेच सौदी अरेबियामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये मोठे बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. तर सौदी अरेबियातील सर्वात मोठी सरकारी कंपनी अरामकोच्या रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील २० टक्के हिस्सा विकत घेणार असल्याची घोषणा अंबानी यांनी केली होती. याचा जून महिन्यापर्यंत व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post