पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची आकडेवारी आली समोर


एएमसी मिरर : वेब न्यूज
वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरूवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे.
संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्यू गाडी आहे. ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.
आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता आदित्य यांच्या प्रतिज्ञापत्रामधून ठाकरे कुटुंबाची एकूण संपत्ती किती यासंदर्भात पहिल्यांदाच माहिती समोर आली आहे. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने आतापर्यंत कधीच निवडणुक लवढलेली नसल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल आतापर्यंत केवळ अंदाजच व्यक्त केला जात होता.

Post a Comment

Previous Post Next Post