नगर : 'त्या' नराधमांची फाशीची शिक्षा कायम


एएमसी मिरर : नगर 
पारनेर तालुक्यातील लोणी येथील मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निघॄण हत्या करणाऱ्या तीनही आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केली.
न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपिठाने आरोपींची फाशीची शिक्षा कायम केली. सरकारी वकील अमरसिंग गिराशे यांनी सरकार व पिडीतेच्या वतीने काम पाहिले. संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे अशी आरोपींची नावे आहेत.
संपूर्ण जिल्हा हादरवणारी व माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पाच वर्षांपूर्वी, २१ ऑगस्ट २०१४ रोजी तालुक्यातील लोणीमावळा येथे घडली होती. नराधमांनी अतिशय क्रूरपणे पीडितेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारपक्षातर्फे नियुक्ती झाली होती. नगरच्या न्यायालयात नराधमांना फाशीची शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post