नगरच्या महिलेची पुण्यात जाऊन आत्महत्या


एएमसी मिरर : नगर
नगरच्या नागापूर येथील एका विवाहीत महिलेने पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने वाघेश्वर कॉम्प्लेक्सजवळील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, नगर ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिला तिच्या आईसोबत सोमवारी (दि.२८) रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली होती. पण, वाघोली येथे उतरताच तिने आईला सोडून पळ काढला. आईने बराच वेळ तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, अखेर तिचा शोध न लागल्याने आई नगरला परतली. दरम्यान, अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सकाळी हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी जवळील ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली.
पोलिसांना मृत महिलेकडे एक पर्स आढळून आली असून त्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळले. त्या नंबरवर पोलिसांनी फोन करुन मृत महिलेच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post