नगर : दरेवाडी येथे महिलेचा खून; घराच्या समोरच पुरला मृतदेह


एएमसी मिरर : वेब न्यूज 
नगर तालुक्यातील दरेवाडी येथे एका भाजीविक्री करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह घराच्या समोरच पुरवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. राजकन्या महादेव आगाशे (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
दरेवाडी येथील आझाद चौक याठिकाणी एका घरासमोर एक महिलेचा मृत्यूदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती सरपंच अनिल करांडे यांनी भिंगार पोलीसांना दिली. भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
घरासमोर पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. घटना सोमवारी रात्री घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गळा दाबून व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती व दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post