नगरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक


एएमसी मिरर : नगर
गणेशोत्सव व मोहरम काळासाठी शहरबंदी असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक समद वहाब खान हा पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी फरार होता. तो आज घरी येणार असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शहरबंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद वहाब खान पोलिसांना शहरात आढळून आला होता. नगरसेवक खान याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत तो पसार झाला होता. याप्रकरणी भिगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेवक समद खान हा आज सकाळी मुकुंदनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्याला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post