नगर : भारिपच्या दोन दलालांनी नगरची जागा विकली


एएमसी मिरर : नगर 
नगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी किरळ काळे यांना जाहीर झाल्यानंतर वाद उफाळून आले आहेत. भारिपच्या दोन दलालांनी नगरची जागा विकली, असा आरोप वंचितचे दुसरे इच्छुक प्रतीक बारसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. किरण काळे यांच्यासाठी आपण काम करणार नसल्याचेही बारसे यांनी जाहीर केले आहे.
बारसे यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी राज्यांतील पाच जागा ख्रिश्चन समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये नगरच्याही जागेचा समावेश आहे. बारसे यांनी याच मतदारसंघातून त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. आपले तिकीट निश्चित झाले होतेमा त्र भारिपच्या स्थानिक पातळीवरच्या दोन दलालांनी मोठी रक्कम घेतली आणि इथली जागा विकली. जागा ज्यांनी विकली त्यांच्यासाठीही एकवेळ प्रचार केला असता. मात्र किरण काळे यांच्यासाठी प्रचार करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
किरण काळे यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना उमेदवारी कशी दिली? असा सवालही बारसे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उमेदवारी न मिळाल्यास पुढची भूमिका ७ तारखेला जाहीर करू, असेही बारसे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post