'काँग्रेस'ला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही : ओवेसी


एएमसी मिरर : वेब न्यूज
देशात काँग्रेस पक्ष कमजोर झाला असून या पक्षाला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काही उपयोग नाही. या पक्षात आता काहीच राहीले नाही, अशा शब्दात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे आता देशातील जनतेला एसआयएम हा पक्ष सक्षम पर्याय वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात भाजपची सत्ता आल्यापासून मॉब लिचिंगच्या घटना घडत आहे. या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. या सर्व घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत जाऊन हजारो नागरिकांसमोर भारतात सर्व ठीक सुरू असल्याचे बोलतात. मोदी साहेब एवढ्या घटना होऊन देखील भारतात सर्व ठीक चालू असल्याचे कसं काय सांगू शकता? असा सवाल त्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post