एएमसी मिरर : वेब न्यूज
जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन १४४ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही सर्व मुलं ९ ते १७ वयोगटातील आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यानतंर ही कारवाई करण्यात आली, असेही सांगण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या १४४ अल्पवयीन मुलांपैकी १४२ मुलांना सोडण्यात आलं आहे. तर दोघांना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. बाल हक्क कार्यकर्ते इनाक्षी गांगुली आणि सांता सिन्हा यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीला बेकायदेशीपणे मुलांना ताब्यात घेण्यात आल्याच्या आरोपांची शहानिशा करत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अली मोहम्मद यांनी राज्यातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा आणि संबंधित न्यायालयांकडून अहवाल मागवला होता. त्यात ही माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Post a Comment