भाजपने २० आमदारांना दाखवला घरचा रस्ता; तिकीटं कापली



एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १५० उमेदवार जाहीर केले आहेत. यातून विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांसह ५० विद्यमान आमदारांची तिकीटं कापल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून, बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.
माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकिट कापल्यामुळे नाराज समर्थकांनी उमेदवार पराग शहा यांची घाटकोपरमध्ये गाडी फोडली. बोरीवलीमधून उमेदवारी न दिल्यामुळे चिडलेल्या तावडे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी देत मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आले आहे. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे. जळगावातील चाळीसगाव मतदारसंघातून उन्मेष पाटील यांना आपल्या पत्नीला तिकीट मिळावं, अशी आशा होती. मात्र ती मावळल्याने पाटीलही नाराज आहेत.

भाजपच्या या आमदारांचा पत्ता कट
१) उदेसिंह पाडवी, शहादा
२) सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर
३) राजू तोडसाम, आर्णी
४) मेधा कुलकर्णी, कोथरूड
५) दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट
६) विजय काळे, शिवाजीनगर
७) आर.टी. देशमुख, माजलगाव
८) सरदार तारासिंग, मुलुंड
९) विष्णू सावरा, विक्रमगड
१०) संगीता ठोंबरे, केज
११) सुधाकर भालेराव, उद्गीर
१२) राजेंद्र नजरधने, उमरखेड
१३) बाळा काशीवार, साकोली
१४) एकनाथ खडसे, मुक्ताईनगर
१५) चंद्रशेखर बावनकुळे, कामठी
१६) चरण वाघमारे, तुमसर
१७) बाळासाहेब सानप, नाशिक पूर्व
१८) विनोद तावडे, बोरीवली
१९) राज पुरोहित, कुलाबा
२०) प्रभुदास भिलावेकर, मेळघाट

Post a Comment

Previous Post Next Post