एएमसी मिरर : वेब न्यूज
प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीवरुन विरोधकांनी घेतलेला आक्षेप फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अर्जाबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, प्रशांत पवार यांच्यासह इतर काही उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर याबाबत सुनावणी झाली. यावेळी संदीप जोशी, वकील उदय डबले आणि पारिजात पांडे हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. विरोधकांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली. नोटरी स्टॅम्प जुन्या तारखेचा मारला गेला आहे, असा आक्षेप होता. मात्र, नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे , जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतीत तथ्य नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Post a Comment