काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुखांना उमेदवारी


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभेसाठी काँग्रेसची १९ उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघात कॉंग्रेसने लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश केला आहे. अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे आणि मालाडचे अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनाही या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार
  1. उदयसिंग पाडवी - नंदुरबार

  2. डी.एस. अहिरे - साक्री

  3. साजिद खान - अकोला पश्चिम

  4. सुलभा खोडके - अमरावती

  5. बलवंत वानखेडे - दर्यापूर

  6. आशिष देशमुख - नागपूर दक्षिण-पश्चिम

  7. सुरेश भोयर - कामठी

  8. उयदसिंग यादव -रामटेक

  9. अमर वरदे - गोंदिया

  10. महेश मेंढे - चंद्रपूर

  11. माधवराव पवार - हडगाव

  12. खैसार आझाद - सिल्लोड

  13. विक्रांत चव्हाण - ओवाला माजीवाडा

  14. हिरालाल भोईर – कोपरी पाचपखाडी

  15. बलदेव खोसा - वर्सोवा

  16. आनंद शुक्ला - घाटकोपर पश्चिम

  17. लहू कानडे - श्रीरामपूर

  18. सुशील राणे - कणकवली

  19. राजू आवळे – हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post