'हीच ती वेळ' : सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपल्या अनुभवाचा दाखला देत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना एक राजकीय सल्ला दिला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भुमिकेवर शिवसेनेने ठाम रहायला हवं, असेही त्यांनी म्हटले आहे. स्वतःच्या अनुभवाचा दाखला देताना फेसबुकवरुन त्यांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२००७ साली मी २४ वर्षांचा होतो. त्यावेळी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर मी निवडून गेलो होतो. यावेळी काँग्रेसला बहुमत असल्याने बहुतांश सदस्यांची मीच अध्यक्ष व्हावा अशी इच्छा असताना माझ्या कमी वयाचे कारण सांगत पक्षातील काही जणांनी माझ्याकडून ही संधी हिसकावून घेतली. त्यावेळी देखील बराच खल होऊन सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले होते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अध्यक्षांनी काही आपले पद सोडलेच नाही. अखेर अडीच वर्षांनी पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली. मात्र, विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. त्यामुळे माझी अध्यक्षपदाची संधी हुकली. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती, तांबे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post