'उदयनराजे यांनी असं करायला नको होतं'


एएमसी मिरर : वेब न्यूज
उदयनराजे भोसले यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. असं व्हायला नको होतं. मात्र, अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती या समाजात आहे. त्याच प्रवृत्तीला बळी पडून उदयनराजे भोसले यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.
जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही. कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे मुंडे म्हणाले.
लोकांना आता विकासाचं राजकारण हवं आहे. या परळी मतदारसंघात विकास झाला नाही. मतातून निवडून आलेलं नेतृत्व निष्क्रिय आहे, ही भावना जनतेतून दिसत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा, विचारांचा वारसरदार, तसंच त्यांचा या मातीप्रती जी स्वप्न होती, ती पूर्ण करणारा वारसदार आता नक्कीच ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post