एएमसी मिरर : वेब न्यूज
बहुप्रतिक्षित राफेल लढाऊ विमान हवाई दल दिनाच्या दिवशी फ्रान्सने भारताला सोपवले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: पहिल्या राफेल विमानाची पूजा केली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी या विमानातून उड्डाणही केले.
राफेल विमान भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारताची ताकद आणखी वाढणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये 2016 मध्ये 36 राफेल विमानांचा करार झाला होता. 2022 पर्यंत सर्व विमान भारताला मिळणार आहेत.
राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असे म्हटले जात आहे.
Post a Comment