मुंबई विमानतळ विकत घेण्याची अदानी समूहाची तयारी


एएमसी मिरर : वेब न्यूज
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित आठ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्येच अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. सध्या एमआयएएलचे १३.५ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे.बिझनेस स्टॅण्डर्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवहारासाठी अदानी समूह १० हजार कोटी गुंतवण्यास तयार असून ते कायदेशीर निकालाची वाट पाहत आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बिडवेस्टने त्यांच्या मालकीची सर्व हिस्सेदारीचे हक्क अदानी समूहाला विकण्याची तयारी दर्शवली आहे. विमानतळाची किंमत आठ हजार कोटी गृहित धरुन बिडवेस्टने ७७ रुपये प्रती समभाग या दराने सर्व हक्क एक हजार २४८ कोटींना विकण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिडवेस्टने आधी आपल्या मालकीचा हिस्सा जीव्हीके समूहाला विकण्याचे ठरवले होते. मात्र नियोजित वेळेत जीव्हीकेला व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यामुळे हे प्रकरण अदानी समूहाने या प्रकरणात राष्ट्रीय लवादाला लक्ष घालण्याची विनंती केली. लवादाने जीव्हीके समूहाला ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्याचा कालवाधी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post