सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांवर पाळत; सरकारने व्हॉट्सअ‍ॅपकडे मागितले स्पष्टीकरण


एएमसी मिरर : वेब न्यूज
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भारतीय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी झाल्याचे समोर आल्यानंतर मुख्य विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती व दूरसंचार मंत्रालयानेने व्हॉट्सअ‍ॅपकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपला यावर उत्तर द्यावे लागणार आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी खुलासा केला होती की, एका इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून जगभरातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची हेरगिरी करण्यात आली आहे. याला काही भारतीय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्तेही बळी पडले आहेत. मात्र, किती भारतीयांची हेरगिरी करण्यात आली, हे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले, इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून हैकर्सने हेरगिरीसाठी सुमारे १४०० लोकांचे फोन हॅक केले आहेत. चार खंडातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स याचे शिकार झाले आहेत. यामध्ये राजकीय व्यक्ती, पत्रकार, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि सुप्रीम कोर्टाकडे या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्वीटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला विनंती केली की, त्यांनी या प्रकरणाची स्वतः तत्काळ दखल घ्यावी आणि सरकारची जबाबदारी निश्चित करावी. त्यांनी म्हटले की, आपल्याच नागरिकांसोबत गुन्हेगारांप्रमाणे व्यवहार करणाऱ्या या सरकारने देशाचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post