'हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन यांच्यापैकी एकाही निर्वासिताला देश सोडावा लागणार नाही'एएमसी मिरर : वेब न्यूज

मला आज हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन निर्वासितांना आश्वासन द्यायचे आहे, तुम्हाला केंद्राकडून भारत सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. एनआरसी अगोदर आम्ही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणणार आहोत,  ज्यामुळे या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री शाह यांनी सांगितले आहे.
कोलकाता येथे ‘एनआरसी’ जागरूकता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा नारा सर्वप्रथम पश्चिम बंगालमधूनच देण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालमधूनच एक देश, एक संविधानचा नारा दिला होता, असे म्हणत त्यांनी  ”जहां हुए बलिदान मुखर्जी वह कश्मीर हमारा है”, असा नाराही दिला.

Post a Comment

Previous Post Next Post