भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या


एएमसी मिरर : वेब न्यूज
भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तज्ज्ञ तुषार अत्रे यांची अमेरिकेतून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.
कॅलिफोर्नियातील त्यांच्या राहत्या घरातून मंगळवारी (१ आक्टोंबर) अत्रे यांचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळला. या प्रकरणात अनेक संशयित असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.५० वर्षीय तुषार यांची सिलीकॉन व्हॅलीमध्ये कंपनी होती. अपहरणाअगोदर अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post