धनंजय मुंडेंविरोधात संताप; जामखेडमध्ये मोर्चा काढून निषेध


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ भाषेत टिका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात आफके ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यात विविध गावांमध्ये मोर्चे निघाले आहेत. त्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मूक मोर्चा काढून धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.


शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा विडा येथे झालेल्या प्रचार सभेतील पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध टिका करतानाचा अश्लिल भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर महिलांमध्ये आणि राज्यभरातील सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या टिकेचा निषेध व्यक्त करत विराट मोर्चा काढला. त्यानंतर आता जामखेड तालुक्यातील खर्डा गावातही मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post