टीका करणाऱ्या चीनला भारताने सुनावले


एएमसी मिरर : वेब न्यूज
जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा भारताचा निर्णय बेकायदा आणि निरर्थक असल्याची टीका चीनने केली होती. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयामुळे आपल्या सप्रभुतेला आव्हान निर्माण होत असल्याचा आक्षेप चीनने घेतला आहे. भारताचा निर्णय बेकायदा आणि निरर्थक असून त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीनच्या नियंत्रणाखाली जो भाग आहे ते सत्य बदलणार नाही. चीनच्या अंखडतेचा भारताने आदर करावा आणि सीमावर्ती भागात शांतता राहिल याची काळजी घ्यावी असे चीनच्या परराष्ट्र मंत्रलायने म्हटले आहे.
चीनच्या या भूमिकेवर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. अन्य देशांनी भारताच्या सप्रभुता आणि अंखडतेचा आदर करावी याची आठवण भारताने चीनला करुन दिली आहे. पाच ऑगस्टला भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने प्रखर विरोध केला होता. चीनचा हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन गेला. पण तिथे त्यांना यश मिळाले नाही. पाकिस्तानने बरीच आगपाखड केली पण मलेशिया, टर्की आणि चीन वगळता त्यांना कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post