एएमसी मिरर : वेब न्यूज
आरे येथील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरेमध्ये कापण्यात येणारं प्रत्येक झाड आपला आमदार पाडेल, याची जाणीव सरकारला व्हायला हवी. ती जाणीव झाल्यानंतर त्यांची झाडं पाडण्याची हिंमत होणार नाही. काही महिन्यापूर्वी काही जण आरेला कारे करत होते. परंतु आता सर्वजण झोपा रे करत आहेत. परंतु आरेमध्ये झाडं तोडायला सुरूवात झाली. कोणी झाडांना मिठ्या मारणार होते. कोणी झाड तोडू देणार नव्हते, ते सर्व आहेत कुठे? असा सवाल अव्हाड यांनी केला आहे. सरकारवर दडपशाहीचा आरोपही त्यांनी केला आहे.
Post a Comment