पावसामुळे कालची घाण धुवून निघाली; राम शिंदेंचे रोहीत पवारांवर टीकास्त्र


एएमसी मिरर : नगर 
वरुण राजाने हजेरी लावत कालची कर्जतमधील घाण धुऊन काढली, अशा शब्दात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'बारामती'ची शिकार मीच करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना रोहीत पवार यांच्या शक्तीप्रदर्शनावर टीका केली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे यावेळी उपस्थित होत्या.
गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला येणार्‍या निवडणूकीत फक्त चाळीस जागा मिळतील. भाजप मित्र पक्षांना २४८ जागा मिळणार आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज नसून त्यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. खडसे यांच्यावर आणखी काही वेगळी जबाबदारी देण्यात येऊ शकते, असे ते म्हणाले.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्यावर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही. मावळला राष्ट्रवादीचे नेते पवार यांची पिढी निवडणुकीत उतरली होती. त्यांना तेथे जनतेने उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या नाराजी नाट्याच्या भूमिकेबद्दल काहीतरी वेगळे कारण आहे. लोकसभेला शरद पवार साहेबांना माघार घ्यावी लागली. याचे कारण तिसरी पिढी मागे हटायला तयार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post