'तिकीट का मिळाले नाही, याबद्दल पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करेन'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
‘आधी देश, मग पक्ष आणि मग आपण या तत्वानुसार आम्ही चालतो. पक्ष दणदणीत मताधित्याने निवडून येणार आहे’ असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. तिकीट का मिळाले नाही, याबद्दल अमित भाई आणि पक्ष श्रेष्ठींशी भविष्यात नक्कीच चर्चा करेन, असेही तावडे यांनी म्हटले आहे.
भाजपाने विनोद तावडेंना तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी एका खासगी वाहिनीकडे बोलताना त्यांचे मत व्यक्त केले आहे. मी का नाही याबद्दल माझी किंवा पक्षाची काही चुक नाहीय. याबद्दल मी सन्माननिय अमित भाईंशी चर्चा करेने. पण सध्या निवडणुका असल्याने मी त्यावर काम करण्यास सुरुवात करणार आहे. पक्षाचे काम अधिक अधिक चांगल्या पद्धीतने करण्यावर माझा भर आहे. जे जे काम मला दिले जाईल ते मी करणार आहे, असे ते म्हणाले.

संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर काही संस्कार आहेत. त्यानुसार मी पक्ष देईल ते काम करेन आणि पक्ष पूर्ण मजबुतीने निवडूण पुन्हा सत्तेत आणेन, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post