एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४५ जणांची नावं आहेत. विशेष बाब म्हणजे आजच्याही यादीत वरळी मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे वरळीत राजकाका पुतण्या आदित्यला मदत करणार का? या चर्चेचा दुसरा अंक सुरु झाला आहे. मंगळवारीच मनसेने पहिली यादी जाहीर केली. या यादीत २७ जणांची नावं होती. त्यामध्ये वरळी मतदार संघाचा उल्लेख नव्हता. आता आज जाहीर झालेल्या यादीतही वरळी मतदारसंघाचा उल्लेख नाही.
आणखी एक खास बाब म्हणजे मनसेच्या दुसऱ्या यादीतही बाळा नांदगावकर यांचे नाव नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर निवडणूक लढवणार की नाही याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत.
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी... pic.twitter.com/yPUlMGFdhb— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 2, 2019
Post a Comment