मनसेची तिसरी यादी जाहीर, रोहित पवारांविरोधात भिसेंना उमेदवारी


एएमसी मिरर : वेब न्यूज 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. यात 32 उमेदवारांचा समावेश असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या विरोधातही मनसेने उमेदवार दिला आहे. समता इंद्रकुमार भिसे यांना मनसेने रिंगणात उतरवले आहे.
मनसेने या आधी दोन याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 27 जणांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 45 जणांचा समावेश होता. आता तिसऱ्या यादीत 32 जणांची नावे आहेत. आत्तापर्यंत मनसेने 104 उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे या यादीतही वरळी मतदारसंघाचा उल्लेख नाही. त्यामुळे राजकाका पुतण्या आदित्य ठाकरेंना मदत करणार, हे निश्चित मानले जात आहे.Post a Comment

Previous Post Next Post