विधानसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रमुख पक्षांनी एक-दोन याद्या जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही यादी जाहीर केली नव्हती, त्यामुळे पक्षांतर्गत तसेच आघाडीअंतर्गत असलेल्या वादांबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 77 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
77 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील वरळीच्या मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे वरळीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
राष्ट्रवादीकडून बारामतीतून अजित पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील, घनसावंगीमधून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, दिंडोशीतून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी
Post a Comment

Previous Post Next Post