कणकवलीमधून नितेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी?


एएमसी मिरर : वेब न्यूज
नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न करताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. तर चार ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा निर्णय झाला असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 'फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता' असं ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post