अभिजीत बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट


एएमसी मिरर : वेब न्यूज
नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट खूच छान झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. “आमच्यामध्ये विविध विषयांवर निरोगी आणि व्यापक संवाद झाला. भारताला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.” असे मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
मोदी म्हणाले, “नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी चांगली भेट झाली. त्यांच्याशी बोलताना मानवी सक्षमीकरणाबद्दलची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून येते. आमच्यात निरनिराळ्या विषयांवर निरोगी आणि व्यापक संवाद झाला. भारताला त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान असून त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
नोबेल सारखा जागतिक सन्मान मिळाल्यानंतर अभिजीत बॅनर्जी पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत. दरम्यान, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते कोलकात्यात जाऊन आपल्या आईची भेट घेणार आहेत, तसेच दोन दिवस कोलकात्यात घालवणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींना भेटणं वैशिष्ट्यपूर्ण अनुभव होता अशी प्रतिक्रया बॅनर्जी यांनी दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी मला बराच वेळ दिला आणि त्यांनी आपण भारतासाठी जो मार्ग निवडला आहे त्याबाबत सांगितले. त्यांच्या धोरणांबाबतही त्यांनी माहिती दिली आणि यामागे त्यांचा काय विचार आहे हे देखील यावेळी सांगितले. त्याचबरोबर नोकरशाहीला जनतेप्रती अधिक जबाबदार बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान चर्चेदरम्यान सांगितले. ही देशासाठी चांगली बाब असून पंतप्रधानांना भेटणे माझ्यासाठी चांगला अनुभव होता, असे यावेळी बॅनर्जी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post