पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार : नरेंद्र मोदी


एएमसी मिरर : वेब न्यूज 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार असल्याचं म्हटलं आहे. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेत आहेत. पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेली ७० वर्ष जे हरियाणामधील शेतकरी आणि आपल्या हक्काचं पाणी आहे ते पाकिस्तानला मिळत आहे. पण हा मोदी हे पाणी रोखणार आणि तुमच्या घरापर्यंत आणणार. मी आधीच यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी आपला देश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे. यामुळेच मोदी तुमच्यासाठी लढत आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post