राज ठाकरेंची शिवसेनेवर सडकून टीका


एएमसी मिरर : वेब न्यूज 
इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, अशी टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली. याशिवाय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावरुनही राज ठाकरेंनी टीका केली. गोरेगाव येथील सभेत ते बोलत होते.
नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यावेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो असं म्हटलं, मात्र कधी राजीनामा दिला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नुसत्या थापा मारल्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

झाडं कापल्यानंतर आरेला जंगल घोषित करणार का?
आरेतील वृक्षतोडीवरुनही राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. आरेतील शेकडो झाडे कापली, न्यायालये देखील सरकारला साजेसं असे निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? असं राज ठाकरेंनी म्हटलं.
मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती. आरेमध्ये कार शेड नको यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला. ज्याठिकाणाहून मेट्रो सुरु होत तिथे कार शेड करा, सरकारला सूचवलं होतं. मात्र सरकारला कोणाच्या घशात ती जागा घालायची आहे? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंच्या गोरेगावमधील सभेतील मुद्दे
 • भाजप-शिवसेने सरकारकडून रोज नवनवीन थापा ऐकायला मिळतात - राज ठाकरे

 • ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरुन निवडणुकीवर बहिष्कार टाकायला विरोधी पक्षांचा नकार - राज ठाकरे

 • ईडीची चौकशी लावली तरी माझं थोबाड बंद होणार नाही- राज ठाकरे

 • निवडणुकीच्या राजकारणासाठी चौकशा मागे लावल्या आहेत- राज ठाकरे

 • जे घाबरले ते भाजपमध्ये गेले, मी या सगळ्या चौकशांना घाबरत नाही- राज ठाकरे

 • आरेवरुन शिवसेना सर्वांना मुर्ख बनवतेय - राज ठाकरे

 • पर्यावरण मंत्री शिवसेनेचे असताना आरेतील झाडे कापली कशी? - राज ठाकरे

 • आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? राज ठाकरेंचा सवाल

 • भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेले, कुठे राहिलं 'पार्टी विथ डिफरन्स'- राज ठाकरे

 • बाळासाहेब असताना शिवसेनेत बाहेरचे नेते आयात करावे लागत नव्हते- राज ठाकरे

 • कलम 370 रद्द केलं त्याबद्दल अभिनंदन, मात्र इतर मुद्द्यांवर कोण बोलणार? - राज ठाकरे

 • कलम 370 चा महाराष्ट्रातील राजकारणाची काय संबंध - राज ठाकरे

 • शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनाम्याची केवळ धमकी दिली

 • आमची युतीत इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, उद्धव ठाकरेंना टोला

 • जपानकडून 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी आहे, यासाठी आदिवासींच्या जमिनी का घेतल्या जात आहेत - राज ठाकरे

Post a Comment

Previous Post Next Post