एएमसी मिरर : वेब न्यूज
लोकांना काय आवडतं याकडे लक्ष देऊ नये. छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागावं, असा टोला विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला आहे. रामराजे भाजपात जाणार की, शिवसेनेत याविषयी संभ्रम आहे. मात्र, त्यांनी भाजपात जाणार असल्याचे संकेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहेत.
सातारा जिल्ह्याला राजकीय संस्कृती आहे. उदयनराजेंविषयी मी काहीही बोलणार नाही. छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागायला हवं. लोकांना काय आवडतं, याकडे त्यांनी लक्ष द्यायला नको, असे रामराजे यांनी म्हटले आहे.
Post a Comment