'आरे'प्रकरणी विद्यार्थ्यांचे सरन्यायाधीशांना साकडे; उद्या सुनावणी


एएमसी मिरर : वेब न्यूज
मुंबईतील आरे वृक्षतोड प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून उद्या (७ ऑक्टोबर) रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागून राहिले आहे.
विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना रविवारी सकाळी आरे वृक्षतोडप्रकरणी एक पत्र लिहिले होते. त्यानुसार, सुप्रीम कोर्टाने मुंबईतील आरे प्रकरणाची दखल घेत यामध्ये हस्तक्षेप करावा. मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुंबई पोलिसांकडून सुरु असलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post