महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आज सायंकाळी 6 वाजता होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार आहेत. 
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपसह रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांची महायुती सज्ज झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर सायंकाळी नरीमन पॉइंटच्या यशवंतराव चव्हाण सभागृहासमोरील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहात महायुतीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कोणत्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याचे चित्र सायंकाळी स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधतील आणि महायुतीची भूमिका स्पष्ट करतील.

Post a Comment

Previous Post Next Post