अभिषेक कळमकर म्हणजे दगडाला शेंदूर फासलेला म्हसोबा : डॉ.योगेश चिपाडे


एएमसी मिरर : नगर
पक्ष नेत्यांच्या आदेशान्वये महापौर झालेल्या अभिषेक कळमकर यांनी आरोप करताना स्वतःची राजकीय उंची तपासावी. जगताप पिता-पुत्रांनी आपल्याला महापौर करण्यासाठी स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची नाराजी तुमच्यासाठी ओढवून घेतली होती, याची तरी जाण ठेवायला हवी होती. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने तर केलेच नाही. पण महानगरपालिकेत टक्केवारी वसूल करण्यातच कारकिर्दी वाया घातली, असा घाणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश चिपाडे यांनी केला आहे.


या संदर्भात त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी नगरकरांची दिशाभूल करण्याचे उद्योग त्यांनी सुरु केले आहेत. पण नगरकर आपल्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत. नगरकरांना आपली राजकीय उंची व राजकीय परिपक्वता चांगलीच माहिती आहे. संग्रामभैय्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. तोच मुद्दा सर्व समाजातील घटकांना भावला आहे. त्यामुळे अभिषेक कळमकर यांनी त्यांच्या नवमित्रांसारख्या थापा मारण्याचे उद्योग बंद करावेत. अभिषेक कळमकर म्हणजे दगडाला शेंदूर फासलेला व सुशिक्षितपणाचा आव आणलेला ‘म्हसोबा’ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post