दिशाभूल करणाऱ्या व पोळी भाजणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध रहा : बाबासाहेब गाडळकर


एएमसी मिरर : नगर
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या आवाहनावरुन त्यांच्या वैचारिक पातळीची कीव करावीशी वाटते. ज्या कुटुंबाला एक वैचारिक वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लाभला. तो वैचारिक वारसा धूळीस मिळविण्याचे काम त्यांनी आर्थिक फायद्यासाठी सुरु केले आहे. त्यांनी स्वतःची निष्ठा विकली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी पलटवार केला आहे.


गाडळकर यांनी म्हटले की, महानगरपालिकेत नगरसेवक व महापौर असताना यांचे कामे काय असतात हे त्यांना समजले नाही. भितीपोटी ते मनपा निवडणुकीत उभे राहण्यासही तयार झाले नाही. यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या तोंडून असे प्रबोधनकारक आवाहन होत असताना त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. त्यांच्या रूपाने आमच्या नेत्याच्या नावावर राजकीय पोळी भाजणारा नवीन 'पुरणपोळी मामा' उदयास आला, अशी खिल्लीही गाडळकर यांनी उडविली आहे. नगरकर भूलथापाला बळी पडणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post