'युती'ने वंजारी समाजाचा वापर केला घेतला; आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा


एएमसी मिरर : नगर 
आजपर्यंत वंजारी समाज हा नेहेमीच शिवसेना-भाजपा युतीसोबत राहिला. मात्र युतीच्या नेत्यांनी या समाजाचा केवळ मतासाठीच वापर करुन घेतल्याचा आरोप शहरातील वंजारी समाजबांधवांनी केला आहे. युतीला धडा शिकविण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना शहरातील सर्व समाजबांधवांच्यावतीने पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे समाजाचे नेते संजय बुधवंत यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीबाबत रणनिती ठरविण्यासाठी नगर शहरातील वंजारी समाजबांधवांच्या प्रमुख प्रतिनिधींशी बैठक शुक्रवारी (दि.18) सायंकाळी झाली. या बैठकीस संजय बुधवंत, राजेंद्र बुधवंत, ऋषभ बुधवंत, राहुल बुधवंत, विकी बुधवंत, देविदास पालवे, नितीन गिते, विजय पालवे, आनंद गिते, सुनिल गंभीरे, बंटी गर्जे, अनिल पालवे, झुंबर आव्हाड, बबन घुले, भगवान आव्हाड, अजय कराड, गोरख बडे, अभिजित जायभाय, अंबादास घुले, प्रविण पालवे, प्रशांत पालवे, सुधीर पोटे, बाबासाहेब घुले, राहुल सांगळे, अजित जाधवर, महेश शिरसाठ, अशोक गंभीरे, गोरख सांगळे, सुबोध फुंदे, सुशांत फुंदे, अभिषेक पालवे, संदीप पालवे, अमोल खेडकर, सतिष ढाकणे, भारत आव्हाड, म्हातारदेव पालवे, सुभाष शिरसाठ, संजय फुंदे, भाऊसाहेब आघाव, नारायण ढाकणे, सचिन लाड, भैरव सानप, अमोल आंधळे, संजय वायभासे, मदन पालवे, श्रीधर ढाकणे, निलेश पालवे, दिनेश पालवे, आकाश पालवे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
संजय बुधवंत म्हणाले की, महाराष्ट्रात वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. हा समाज नेहमीच शिवसेना-भाजपा युतीला मतदान करत आला आहे. असे असताना शिवसेना भाजपा युतीने 288 जागांपैकी वंजारी समाजाचा अवघा 1 उमेदवार दिला आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने राज्यात 7-8 ठिकाणी वंजारी समाजाच्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे युती केवळ समाजाचा मतासाठी वापर करीत असल्याचे स्पष्ट होते. यापुढे आपल्या मताचा कोणी वापर करु नये, यासाठी या निवडणुकीत युतीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी नगर शहर मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा देत असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

वैदु समाजाचाही आ.जगताप यांना पाठिंबा
शहर विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा ठराव शहरातील वैदु समाजबांधवांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये शुक्रवारी (दि.18) सायंकाळी झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात शहरात झालेल्या विकासकामांमुळे हा पाठिंबा देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी वैदु समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post