शिवसेनेच्या माध्यमातून बोल्हेगाव, नागापूर परिसरात सर्वाधिक कामे : अनिल राठोड


एएमसी मिरर : नगर
बोल्हेगाव, नागपूर या परिसरातील नागरिक कायम शिवसेनेच्या पाठिशी ठाम उभे राहिले आहेत. त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम अग्रेसर राहिली. रस्त्यासाठी आंदोलन करुन प्रश्न मार्गी लावला. शिवसेना नगरसेवक, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. तरीही शिवसैनिक डगमगले नाहीत. त्यामुळे या भागातील जनतेचा विश्वास शिवसेनेवर कायम आहे, असा विश्वास शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी व्यक्त केला.


 महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी प्रचारार्थ बोल्हेगाव व नागपूर भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता सप्रे, निलेश भाकरे, मदन आढाव, अक्षय कातोरे, भालचंद्र भाकरे, रीता भाकरे आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.
नगरसेविका रीता भाकरे म्हणाल्या की, या परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहिली आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा आम्ही कायम केला आहे. या भागातून शिवसेनेला विधानसभेमध्ये  सर्वात जास्त मताधिक्य मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post