नगर शहराला महानगरचा लुक देणार : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
बुरुडगाव येथे खतनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे सावेडी कचरा डेपो बंद होणार आहे. तपोवन रोडचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. सावेडी उपनगरामध्ये आरोग्य केंद्राच्या उभारणीसह जलतरण तलाव निर्माण करणार आहे. लक्ष्मीनगर येथे 1 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक केला आहे. पाईपलाईन रोड व तपोवन रोडच्या दरम्यान उद्यानाची निर्मिती करणार आहे. विकासाचा संकल्प हाच ध्यास घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. पुढील पाच वर्षांत अधिक जोमाने काम करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.


प्रभाग एकमध्ये आयोजित कार्यक्रमात आ.संग्राम जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मीना चव्हाण, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण,  निखिल वारे, बाळासाहेब पवार, राजेंद्र तागड, स्वप्निल ढवण, सतिष ढवण, प्रा.माणिक विधाते, दगडू पवार, संजय बुधवंत, शिवाजी साळवे, अरूण मतकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षांत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करू शकलो. सर्वात महत्वाचा प्रश्न असलेल्या तपोवन रस्त्याचे काम त्यांनी मार्गी लावले. तसेच या भागात कचरा डेपोमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तोही प्रश्न आ.संग्राम जगताप यांनी मार्गी लावला आहे. या प्रभागामध्ये फक्त विकासाचे राजकारण केले जाते, असे ते म्हणाले.
नगरसेविका बारस्कर म्हणाल्या की, आ.जगताप हे विकासाची संकल्पना घेऊन काम करत असल्यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील महिलांचे संघटन केले जाणार आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. उपनगर हे शहराचे विकासाचे मॉडेल असेल. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी आ.संग्राम जगताप यांना संधी द्यावी. यावेळी निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर आदींचे भाषणे झाली.
मल्हार महासंघाच्यावतीने अध्यक्ष अरुण मतकर यांनी आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. प्रास्तविक डॉ.सागर बोरुडे यांनी केले. नगरसेविका चव्हाण यांनी आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post