हिंदुराष्ट्रसेनेचा अनिल राठोड यांना पाठींबा


एएमसी मिरर : नगर
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी शिवसेना नगर शहरात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकच शिवालय आहे. याठिकाणी सर्वांचेच प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना हिंदुराष्ट्र सेना जाहीर पाठींबा देत असल्याचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांनी जाहिर केले.
दिगंबर गेंट्याल यांनी तसे पत्र उपनेते अनिल राठोड यांना दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, सागर ठोंबरे, परेश खराडे, महेश निकम, सचिन पळशीकर, नाना मोरे, भैय्या भगत, सुनील जाधव, घनशाम बोडखे, जय बिडकर, अक्षय निकम, ओमकार शिंदे, स्वप्नील लाहोर, विशाल गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post