एएमसी मिरर : नगर
महर्षी गौतम सेवा संस्था व राजस्थानी गुजर गौड ब्राह्मण मारवाडी समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला आहे. आमदार अरुण जगताप यांच्याकडे याबाबतचे पत्र देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, सचिव कैलास उपाध्याय, पवन जोशी, संजय उपाध्याय, नरेंद्र कांगला, राजेंद्र तिवारी, राजेंद्र जोशी, किशोर उपाध्याय, प्रसन्न तिवारी, संजय उपाध्याय, राधेश्याम रानेजा, अशोक उपाध्याय, लक्ष्मीकांत शर्मा, श्रीगोपाल जोशी, शिवकुमार पांचारिया, अजित जोशी, प्रशांत शिवार आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध अडचणी, विद्यार्थ्यांचे व युवकांचे प्रश्न सोडविण्यास संग्राम जगताप सक्षम आहेत. त्यांचा सकारात्मक विकासमय दृष्टीकोन पाहून निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Post a Comment