गुंड प्रवृत्तींच्या हातात शहराचे प्रतिनिधित्व देऊ नका : अभिषेक कळमकर


एएमसी मिरर : नगर
नगर शहरात विकासाच्या नावावर विरोधी उमेदवार जनतेची दिशाभूल करत आहे. खरेतर त्यांना नगरमध्ये लोकांवर दहशत करण्यासाठी सत्ता हावी आहे. त्यांनी विकास तर काडीमात्र केला नाही. नगरच्या जनतेची २०१४ पासून फसगत झाली आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तींच्या हातात शहराचे प्रतिनिधित्व देऊ नका, असे आवाहन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे.


महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी प्रचारार्थ कापड बाजार येथून प्रचारफेरी काढून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सर्व महायुतीचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.
कळमकर म्हणाले की, शिवसेनेत सर्वांना मान दिला जातो. कोणावरही दहशत केली जात नाही. शिवसैनिक दबावात राहात नाही. मनमोकळे वाघासारखे जगतात. देशात महायुतीची सत्ता आहे. जर राज्यात महायुतीची सत्ता आली आणि नगरचा आमदार महायुतीचा झाला, तर अनेक विकास होतील. एक नवे तर तीन उड्डाणपूल करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post