छत्रपती उदयनराजे भोसले यांची उद्या राशीनमध्ये सभा


एएमसी मिरर : नगर 
कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी (दि.१८) छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा होणार आहे. राशीन येथे सकाळी ११.३० वाजता यासभेचे आयोजन करण्यात आले असून, भाजपचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक हेही या सभेस उपस्थित राहणार आहेत.


पालकमंत्री राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे उपस्थित राहणार होते. मात्र, वादळी पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता उद्या कर्जत-जामखेड मतदारसंघात उदयनराजेंची तोफ धडाडणार आहे. या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राम शिंदे यांनी प्रचारसभा, शक्तीप्रदर्शनात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शनिवारी, केंद्रीय गृह मंत्री व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराचा समारोप होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post