राणे जिथे जातील तिथे वाट लावतात : उद्धव ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात. आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस, अशा शब्दात उद्धव यांनी राणेंवर प्रहार केला.
कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही. कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती, असा हा लढा आहे. मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्यावर याला सातबारा कळतो का ? असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत. जमिनी हडप केल्या नाहीत. त्यामुळे मला सातबारा कळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी राणेंना पाच वर्ष थांबायला सांगाव बघा ते थांबतात का? भाजपाकडून भ्रमनिरास झाल्यावर बघा हेच राणे काय बोलतात ते. गुंडगिरी मोडून तोडून टाकली म्हणून कोकण भगवं झालं. रमेश गोवेकर कुठे गायब झाले? खुनशी वृत्ती अजिबात सहन करणार नाही. मी भाजपावर टीका करायला आलेलो नाही. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. आपण मित्राला सावध करतोय, म्हणून आज कोकणात आलो आहे. टीका करायला आलेलो नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post