अजित पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता फेटाळली


एएमसी मिरर : वेब न्यूज
सुशीलकुमार शिंदे हे स्वतः थकले आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकले असल्याचं म्हटलं पण काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय कधीही थकणार नाहीत असे पक्ष आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता त्यांनी फेटाळून लावल्याचे चित्र आहे.
पुण्यातील मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्याना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाताना, चांगल्या प्रकारे संवाद साधावा. तसेच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार , देखील तेवढ्याच निष्ठेने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post