'सत्ता आल्यावर पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवायचं असतं'


एएमसी मिरर : वेब न्यूज
कुस्ती बरोबरीच्या पैलवानांसोबत खेळतात लहान मुलांशी नाही, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवायचं असतं असा सल्लाही शरद पवार यांनी भाजपा सरकारला दिला.


विधानसभा निवडणूक समोर आली आहे. अशात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणीही दिसत नाही. शरद पवार यांची अवस्था तर शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असं शरद पवार म्हणतात आणि मागे वळून पाहतात तेव्हा कुणीही नसते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना बार्शी येथील सभेत विशिष्ट हातवारे करत शरद पवार यांनी कुस्ती अशांशी लढली जात नाही, असं म्हटलं होतं. आता कुस्ती लहान मुलांशी केली जात नाही बरोबरीच्या पैलवानाशी केली जाते, असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निफाड येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. विद्यमान सरकारला राज्य चालवायची पद्धत ठाऊक नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post