४० लाख बोगस मतदार, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यभरात तब्बल ४o लाख बोगस मतदार तयार करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपावर केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएम बरोबरच आता सर्व पर्याय शोधत आहे. राज्यभरात तब्बल ४0 लाख बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या याद्यांचे निरीक्षण केल्यानंतरच आपण हे विधान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकाच इपिक क्रमांकावर दोन मतदार दाखविण्यात आले आहेत. तसेच ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया थांबवून याद्या दुरूस्त करूनच निवडणूक घेतली जावी, अशी देखील मागणी केली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post